‘वर्ल्ड टीव्ही डे’ च्या निमित्ताने सफर टीव्हीच्या दुनियेची

November 21, 2008 4:52 PM0 commentsViews: 7

21 नोव्हेंबर, मुंबईप्रीती खान / शिल्पा गाडघरोघरी टिव्ही पोहचलाय. रिमोट कोणाचा, यावरुन घराघरात वाद होतात. त्याहून अधिक मारामारी असते ती आपल्याला हव्या त्या सिरीअल्स पाहण्यासाठी दररोज नवनवीन सिरीयल येत असतात पण आजही अनेकजण पूर्वीच्याच सिरीयलच्या आठवणी काढतात. त्या जुन्या दिवसांची ही सफर आजच्या वर्ल्ड टेलिव्हिजन डे निमित्त. सुरुवातीच्या काळात टीव्हीची संख्या कमीच होती. कोणाच्या घरी टीव्ही असल्यास एकच गर्दी व्हायची. याबाबत टीव्हीच्या आठवणीत विजय सावंत रमून जातात. 'आमच्या गावी टीव्ही नव्हतेच. गोरेगावच्या हायस्कूलात टीव्ही होता. मग तिथे जाऊन आम्ही टीव्ही बघायचो ', असं सावंत सांगतात. पण हे टीव्ही पाहणं कधीकधी खर्चिकही व्हायचं.' छायागीतासाठी चार आणे, चित्रपटासाठी 1 रुपया असे पैसे शेजारी आमच्याकडून घेत असत ', असं सीमा कोटनूर यांनी सांगितलं. पूर्वी टीव्ही हे केवळ वेळ घालवण्याचं साधन नव्हतं तर ते एक मिडियम लोकांना एकत्र आणण्याचं होतं. ' मला मालगुडी डेज खूप आवडायचं. त्यात भूमिका करणारे गिरीश कनार्ड माझे मित्र होते. त्यामुळे मी सर्वांना ते माझे मित्र असल्याचं सांगत असे ', असं दत्तात्रय महिंद्रकर सांगत होते. अनेकांना सिरीयलमधील कॅरेक्टर त्यांच्या घरातील झाली होती. टीव्ही तेव्हा बंदही व्हायचा. केवळ 10 वाजेपर्यंतच टीव्ही असायचा. ही होती टीव्हीच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट दुनियेतील सफर.

close