अमरावतीत 1 कोटींच्या रक्कमेसह दोघांना अटक

February 12, 2012 4:31 PM0 commentsViews: 4

12 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांना पैशाच आमिष दाखवल जाईल अशी चर्चा असतांनाच अमरावती पोलिसांनी काल रात्री एका फोर्ड एन्डएव्हर गाडीतून एक कोटीची रोकड जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आशिष बोधनकर आणि ड्रायव्हर मसराम यांना अटक करण्यात आली असून त्यातले बोधनकर हे अर्थराज्य मंत्री राजेंद्र मुळक यांचे जवळचे मानले जातात. ही रक्कम निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणली होती, असा अंदाज पोलिसांचा आहे. पण ही एक कोटी रुपयांची रक्कम पक्षनिधी असून ती काँग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक फंड म्हणून वाटण्यासाठी पाठवण्यात आली होती अस स्पष्टीकरण प्रदेश काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आलं आहे. पण त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार रावसाहेब शेखावत, अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमत्री राधाकृष्ण पाटील अडचणीत आले आहेत. दरम्यान हे पैसे कोणाचे याचा शोध लागला पाहिजे ही आपली भूमिका असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय.

close