नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची सभा

February 12, 2012 10:27 AM0 commentsViews: 7

12 फेब्रुवारी

महापालिका प्रचारामध्ये सगळ्याच पक्षांचे दिग्गज नेते आता उतरले आहे. त्यांच्या एकमेकांवरच्या हल्ल्या – प्रतिहल्ल्याने प्रचारसुद्धा रंगू लागला आहे. त्यातच कालप्रमाणे आजही बहुतेक सगळ्याच दिग्गज नेत्यांच्या सभा आणि रॅली होत आहे. त्यामुळे आजही मतदारांना खमंग मेजवानी मिळणार हे नक्की आहे. काल ठाण्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या सभेत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. त्यालाच आज ठाकरे काय उत्तर देतात. याकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंची आज नाशिकमध्ये जाहीर सभा आहे. वर्सोवा, माहिम आणि परळमध्ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सभा आहेत. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात हडपसरला सभा आहे. पुण्यात आज आणखीही एक सभा होतेय ती म्हणजे काँग्रेस नेते नारायण राणेंची, संध्याकाळी 5.30 वाजता आज पर्वतीगाव इथं राणेंची सभा होणार आहे.

close