उल्हासनगरमध्ये दारू साठा जप्त

February 13, 2012 10:41 AM0 commentsViews: 6

13 फेब्रुवारी

निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना निरनिराळी आमिष दाखवली जात आहे. पैशाचं आणि दारूचं वाटप हे काही आता नविन राहिलेलं नाही. उल्हासनगरमध्ये मतदारांना वाटण्यासाठी आणलेली दारू पोलिसांनी जप्त केली आहे. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये मतदारांना वाटण्यासाठी काही कार्यकर्ते रिक्षातून दारू घेऊन जात असताना रात्री गस्त घालणार्‍या पोलिसांनी या रिक्षाचा पाठलाग करून दारूचा हा साठा जप्त केला. यात दारूचे दोन बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत. या कारवाईत एका भाजप कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.

close