संघपरिवारातील नेत्यांना मारण्याचा कट उघडकीस

November 21, 2008 3:03 PM0 commentsViews: 5

21 नोव्हेंबर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालेगाव स्फोटातल्या आरोपींच्या चौकशीबाबत सरकारवर टीका करत आहेत.मात्र दुसरीकडं एक धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसंच दयानंद पांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातल्या दोन वरिष्ठ नेत्यांना मारण्याचा कट रचला होता. हिंदुत्वाचा मुद्दा ठामपणे मांडत नसल्यामुळे त्यांनी हा कट रचल्याचं एटीएसचं म्हणणंआहे. एटीएस सुत्रांनुसार संघाचे जनरल सेक्रेटरी मोहन भागवत तसंच आरएसएसचे प्रवक्ते इंद्रनिश यांना मारण्याचा कट पुरोहितने रचला होता. ही माहिती एटीएसनं केंद्रसरकारकडे पोहोचवली आहे. पण मालेगाव स्फोटातल्या आरोपींच्या बाजूनं उभा राहणारा भाजप, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनं मात्र सरकारवरच टीका केली. निवडणुका जवळ आल्यामुळे काँग्रेस अशी खेळी खेळत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.

close