आज ठाकरे विरुध्द ठाकरे सामना

February 13, 2012 9:08 AM0 commentsViews: 15

13 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला एक दिवस उरला असताना सर्वच पक्षांनी रोड शो, रॅलीच्या माध्यमातून प्रचाराचा वेग वाढवला आहे. मुंबईत आज बड्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या ठाण्यातल्या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. आणि आज बाळासाहेबांची दुसरी प्रचार सभा एमएमआरडीए मैदानात संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. तर राज ठाकरे जांबोरी मैदान इथल्या सभेला संबोधित करणार आहे. एकंदरीतच आज ठाकरे विरुध्द ठाकरे सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात आहे, दुपारी 4 नंतर ते सभा घेणार आहे. नितीन गडकरी नागपूरमध्ये तर छगन भुजबळ नाशिकला 6 वाजता सभा घेणार आहे. मुख्यमंत्री आज मुंबईत युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते सोलापूरला सभा घेतील. नाशिकच्या प्रचारसभेच राज ठाकरेंनी भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्याला भुजबळ आपल्या सभेत काय उत्तर देतात यावर सर्वांच लक्ष लागलंय.

close