शिट्टी वाजवून..वाजवून प्रचार

February 14, 2012 10:32 AM0 commentsViews: 38

14 फेब्रुवारी

निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये प्रत्येक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी शकल्ल लढवतात. नागपुरात वैशालीनगर प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादीतून बंडखोरी करुन काँग्रेस उमेदवाराच्या विरुध्द ठाकलेल्या विशाल लारोकर याला शिटी हे प्रचार चिन्ह मिळाला आहे. विशालला शिट्टी वाजवण्याचा छंद आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान विशाल शिट्टी वाजवून मतदारांना आकर्षित करतोय. त्याच्या या अनोख्या प्रचारामुळे मतदाराचे मंनोरंजनही होतं आहे आणि लोकांना नवलही वाटत आहे.

close