गुंडाच्या हजेरीतच राणेंचा असाही प्रहार

February 13, 2012 10:27 AM0 commentsViews: 4

13 फेब्रुवारी

नारायण राणे यांनी पुण्यात अजित पवारांवर घणाघाती टीका करताना अजित पवार गुंडांना – गुन्हेगारांना संरक्षण देतात. पुण्यात खून खंडणी बलात्कारासारखे गुन्हे वाढतायात असं सांगत गुन्ह्यांची जंत्रीही दिली. राष्ट्रवादीचे खासदार पद्मसिंह पाटील हे खुनाच्या गुन्ह्यात अडकलेत तसेच जळगावचे आमदार चौाधरी हे बलात्काराच्या गुन्ह्यात सापडलेत अशी राणेंनी टीका केली. पण दिव्याखाली अंधार म्हणतात तसा प्रकार घडला. राणे जेव्हा ही टीका करत होते तेव्हा त्याच व्यासपीठावर हजर होता कुख्यात गुंड अनिल जाधव अर्थात अन्या डॉन, हा काँग्रेसचा नगरसेवक आहे. तो पुन्हा काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 68 ब मधून निवडणूक लढवतोय. अन्यावर खून, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अन्या डॉननं त्याच्या प्रतिज्ञापत्रात याचा उल्लेख केला आहे. ज्या गुन्ह्यात 2 वर्षं शिक्षा होऊ शकेल असे गुन्हे आहेत. काँग्रेसचा प्रचार करताना नारयण राणे हे विसरले की अजितदादांवर टीका करताना आपणही खून खंडणीचे गुन्हे असलेल्या नामचीन अन्या जाधवच्या प्रचारसभेत बोलतोय.

close