उर्दू शायर शहरयार खान यांचं निधन

February 14, 2012 11:46 AM0 commentsViews: 12

14 फेब्रुवारी

प्रसिद्ध उर्दू शायर शहरयार खान यांचं कॅन्सरने निधन झालं आहे. ते 76 वर्षांचे होते. शहरयार खान यांनी उमरावजान आणि गमन या सिनेमासाठी लिहिलेली गीते खूप गाजली होती. 'सीने में जलन आखों में तुफान' आणि 'इन आखों की मस्ती' अशी अनेक गाजलेली गाणी त्यांनी लिहिली आहे. शहरयार खान यांचं खरं नाव कुवर अखलाख मुहम्मद खान. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. आता पर्यंत 20 हून अधिक कविता संग्रह त्यांच्या नावावर आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे ते माजी प्रमुख होते.

close