अडवाणींना एटीएसच्या तपासावर संशय

November 21, 2008 4:07 PM0 commentsViews: 2

21 नोव्हेंबर दिल्लीराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के.नारायणन यांनी आज,भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. यावेळी मालेगाव स्फोटाच्या तपासाबाबत अडवाणी यांना नारायणन यांनी माहिती दिली. अडवाणी यांनी एटीएसच्या तपासावर संशय घेतला होता. त्याबाबत त्यांचं शंकानिरसन करण्यासाठी ही भेट होती असं सांगण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर हिचा पोलीस कोठडीत छळ करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी केली जाईल असं आश्वासन नारायणनं यांनी,अडवाणींना दिल्याचं,भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी सांगितलं

close