काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण;6 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल

February 15, 2012 9:47 AM0 commentsViews: 2

15 फेब्रुवारी

मुंबईतल्या मानखुर्द इथल्या लल्लूभाई पोलीस ठाण्यात शिवनसेनेच्या सहा कार्यकर्त्यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा काँग्रेसचे उमेदवार कोठारी यांचे कार्यकर्ते वॉर्डामधील लोकांना भेटायला गेले होते. पण ते कार्यकर्ते पैशे वाटप करत असल्याचा संशय सेनेच्या कार्यकर्त्यांना आला. सेनेच्या कार्यकर्त्यांनी आडवले असता काही कार्यकर्त्यांनी उडाउडवीची उत्तर दिली. पर्यायाने दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. सेनेच्या वार्डात खिंडीत सापडलेल्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला.याबद्दल मारहाण केल्याची तक्रार काँग्रेसचे लक्ष्मण कोठारी यांनी केली.

close