‘मतदारराजा जागा हो’,युवकांचे आवाहन

February 15, 2012 9:57 AM0 commentsViews: 5

15 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. आता मतदान काही उद्यावर येऊन ठेपले आहे. मतदारराजाला मतदान करा, असं आवाहन वेगवेगळ्या संघटना करत आहे. नाशिकमध्येही मानव उत्थान मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मतदारांच्या जागृतीसाठी मोहिम राबवली जात आहे. मतदानाचा हक्क नक्की बजावा, असं आवाहन हे विद्यार्थी गेले 10 दिवस नाशिकच्या रस्त्यांवर करत आहे. सगळे चोर आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्यातल्या त्यात स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडून द्या, पण मतदान कराच असं आवाहनही या विद्यार्थ्यांनी केलं आहे.

close