मुंबईत महिनाभर मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी

February 15, 2012 10:46 AM0 commentsViews: 4

15 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. येत्या 17 फेब्रुवारीपासून ते 17 मार्चपर्यंत असा महिनाभर ही बंदी असणार आहे. 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यास ही बंदी घालण्यात आली आहे. असे आदेश मुंबई पोलिस, ऑॅपरेशन विभागाचे पोलिस उपायुक्तांनी जारी केले आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांना विजयोत्सव फटाक्याविनाच साजरा करावा लागणार आहे.

close