ठाणे शिवसेनेचं, खणखणीत नाणे !

February 16, 2012 7:46 AM0 commentsViews: 24

17 फेब्रुवारी

ठाण्यातील महापालिकांचे सर्व निकाल जाहीर झाले आहे. आणि ठाण्याचा गड राखण्यात शिवसेनेला यश आले आहे. महायुतीने सुरुवातीपासून आघाडी घेते जोरदार मुंसडी मारली आणि आपला गड कायम राखला. शिवसेनेला 53 जागा मिळाल्या भाजपला 8 जागा तर रिपाइंला 1 जागा मिळाली आहे. एकून महायुतीने 61 जागेवर कब्जा करत गड कायम राखला. तर आघाडीने पाठलाग करत 52 धावांवर दम तोडावा लागला आहे.

'ठाण्याची शिवसेना, शिवसेनेच ठाणे' असं समिकरण ठाणे आणि शिवसेनेचं जोडलं जातं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहरही ठाणे आहे. कारण शिवसेनेचा पहिला विजय हा ठाण्यात झाला होता. तेव्हापासून ठाणे शिवसेनेचं असं म्हटलं जात आहे. यंदाच्या पालिका निवडणुकीत आपला गड राखण्यासाठी खुद्द बाळासाहेब मैदानात उतरले होते. त्यांची पहिली सभा ही ठाण्यातील सेंट्रल मैदानात 45 वर्षानंतर पार पडली होती. यावेळी बाळासाहेबांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जेंव्हा परत येईल तेंव्हा भगवा फडकलेला दिसेल असं आवाहन केलं होतं. आणि ठाणेकरांनी बाळासाहेबांच्या शब्द पाळत ठाणेकरांना शिवसेनेला जिंकून दिले आहे. आता सेनेला फक्त चार जागांची तडजोड करावी लागणार आहे. पण ठाणे शिवसेनेचं खणखणीत नाणे हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

अधिक अपडेटसाठी आयबीएन लोकमत फेसबुक पेजला भेट देण्यासाठी लिंकवर क्लिक करा IBN Lokmat

close