पुण्यात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

February 15, 2012 5:01 PM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

मतदानाच्या पूर्वसंध्येला काळेवाडी व राहटणी परिसरात काँग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तर दुसरीकडे डब्बु आसवानी यांच्या वॉर्डमध्ये काँग्रेस उमेदवार अमर मुलचंदानी यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतले. तर योगेश बहल आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारीचा प्रकार घडला आहे. या सर्व घटनांमध्ये उमेदवारांनी परस्परांविरोधात तक्रारी नोंदवली आहे. पण एकाच तासात घडलेल्या या घटनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

close