दुपारपर्यंत मुंबईत 22 टक्के मतदान

February 16, 2012 8:20 AM0 commentsViews: 9

16 फेब्रुवारी

राज्यातल्या 10 महापालिकांमध्ये सकाळी साडे सात वाजल्यापासून उत्साहात मतदान सुरू आहे. मुंबईत दुपारी 2 वाजेपर्यंत 22.18 टक्के मतदान झालं आहे. मुंबईमध्ये 227 जागांसाठी मतदान होतं आहे. यातील 207 संवेदनशील कें द्र आहेत, तर 4 अतिसंवेदनशील केंद्र आहेत. या पालिका निवडणुकीसाठी एकूण 1 कोटी, 2 लाख, 79 हजार, 377 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 2 लाख 97 हजार युवा मतदार आहेत. तर 57 लाख, 17 हजार, 972 पुरूष मतदार आहेत. आणि 45 लाख, 61 हजार, 605 महिला मतदार आहेत. एकूण 2232 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्येही 1252 पुरूष उमेदवार आहेत तर 980 महिला उमेदवार आहेत. मतदान करण्यासाठी एकूण 8326 मतदान केंद्र आहेत. तर एकूण 41 हजार निवडणूक अधिकारी या निवडणुकीसाठी काम करत आहे.

पक्षीय बलाबल

मुंबई महापालिका – 227- काँग्रेस- 169- राष्ट्रवादी- 58- शिवसेना- 135- भाजप- 63- आरपीआय-29- मनसे- 225- समाजवादी पार्टी- 63

close