नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड

February 16, 2012 8:45 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या कार्यालयाची आणि घराची तोडफोड करण्यात आली. पंचवटीतल्या मालवीय चौकात वॉर्ड 12 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांचं कार्यालय आहे. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार घडला. मनसेचे उमेदवार आणि आमदार पुत्र राहुल ढिकले यांनी ही तोडफोड केल्याची राष्ट्रवादीची तक्रार आहे. तर, राष्ट्रवादीतर्फे पैसे वाटले जात असल्याने असं करावं लागल्याचं मनसेचं स्पष्टीकरण आहे.

close