पाक दौरा रद्द होण्याची शक्यता

November 21, 2008 6:01 PM0 commentsViews:

21 नोव्हेंबरभारताचा पाकिस्तान क्रिकेट दौरा धोक्यात आला आहे. तिथल्या सुरक्षेचा विचार करता हा दौरा जवळ जवळ रद्दच होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन आठवड्यात घेतला जाणार आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्था वाईट असून तेथे भारतीय क्रिकेट टीमला पाठवणं धोकादायक ठरेल. सचिन आणि स्टार खेळाडूंना तेथे धोका निर्माण होऊ शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारताचं एक पथक पाकिस्तानाला जाणार आहे. पण एकंदरीत स्थिती पाहता हा दौरा रद्द होण्याचीच शक्यताच अधिक आहे. या दौ•यात भारत पाकिस्तान विरुध्द तीन टेस्ट पाच वन डे आणि एक व्टेण्टी – 20 ची मॅच खेळणार आहे.

close