नाशिकमध्ये मनसे-भाजप एकत्र ?

February 18, 2012 9:41 AM0 commentsViews: 14

18 फेब्रुवारी

नाशिकमध्ये मनसेनं सर्वाधिक उमेदवार निवडुन आले आहे. आणि मनसे हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. आता मनसेचाच महापौर होणार असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. यासाठी भाजप आणि मनसे एकत्र येऊन सत्ता स्थापणार अशी शक्यता वर्तवण्यात येतं आहे. त्यादृष्टीने मनसेतर्फे चर्चा आणि चाचपणीला सुरवात झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नाशिकमध्ये येत आहे. विजयी उमेदवांराचे अभिनंदन करण्यासाठी तसेच नाशिककरांचे आभार मानण्यासाठी येणार आहेत. पालिकेच्या निकालात मनसेनं मुंंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये जोरदार मुसंडी मारत तब्बल 40 जागा जिंकल्या आहे. मनसे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहेत. गेल्यावेळी मनसेला फक्त 12 जागा मिळाल्या होत्या. त्याखालोखाल राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत आघाडी कामय राखलीय तर काँग्रेस 15, शिवसेना 19, भाजप 14 तर रिपाइंने 3 जागा जिंकल्या आहेत. माकपने 1 तर अपक्षांनी 3 जागी विजय मिळवला आहे.

close