मतदानाला सुट्टी न दिल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा निषेध

February 16, 2012 11:43 AM0 commentsViews: 6

16 फेब्रुवारी

मतदानाला सुट्टी नाकारली म्हणून पिंपरीतल्या दापोडीच्या एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून राज्यभर जनजागृती केली , निवडणूक आयोगानंही मतदानाच्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर केली होती. पण आज ऐन मतदानाच्या दिवशी पिपरी- चिंचवड परिसरातील बोपोडी मधील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील 700 कर्मचार्‍यांना सुट्टी नाकारली आणि फक्त दोन तासात मतदान करुन येण्याचे आदेश दिले आहे. ही कार्यशाळा शहराच्या लांब असल्यामुळे दोन तासात मतदान करुन येणं शक्य नसल्यानं सांगत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी निषेध व्यक्त केला आहे. मतदानाला स्वत: जाऊ शकत नसल्यामुळे, कुंटुबीयांही मतदानापासून वंचित राहणार असल्याचं सांगत कर्मचार्‍यांंनी सरकारचा निषेध केला.

close