पायात घालायला चपलाही नसणार्‍या अलकाने जिंकून दाखवलं !

February 18, 2012 9:59 AM0 commentsViews: 12

18 फेब्रुवारी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यावेळी काही आश्चर्यजनक तरीही अनेकांना सुखावणारे निकाल लागले आहेत. त्यातलाच एक निकाल आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या अलका टेकामचा…घरची कमालीची गरीब परिस्थिती, पायात घालायला चपलाही नसणारी अलका टेकाम ही आदिवासी तरुणी भरघोस मतांनी मनसेकडून घोणसा चिखलगाव गटातून निवडून आली आहे. विरोधी उमेदवार काँग्रेसच्या सुनीता सुरपामचा तिनं दणदणीत पराभव केला. माहुलीच्या या 22 वर्षांच्या अलकाला गावकर्‍यांनीच पैसे जमवून निवडणुकीला उभं केलं होतं. त्या सगळ्यांच्या कष्टांच चीज झालं असल्याचं अलकानं म्हटलं आहे. अलकाच्या धडपडीची आणि कुठलंही आर्थिक बळ नसताना ती देत असलेलेया तिच्या लढ्याची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती. यवतमाळ जि.प.मधल्या मनसेच्या त्या पहिल्याच उमेदवार आहे.

close