नासाची नोकरी सोडून आलेला बाळा’साहेब’ विजयी

February 18, 2012 10:17 AM0 commentsViews: 34

18 फेब्रुवारी

थेट अमेरिकेतून स्वदेशी परतलेल्या लोणारच्या बाळासाहेब दराडेलाही मतदारांनी पसंतीचा कौल दिला आहे. अमेरिकेतील नासाची नोकरी आणि बिझनेस सोडून बाळासाहेब दाभाडे हा तरुण त्याच्या बुलडाण्याजवळच्या गावात परतला आणि शेतकर्‍यांचं कल्याण आणि गावाच्या विकासासाठी त्यानं थेट जिल्हा परिषदेचीच उमेदवारी भरली. आणि मतदारांनीही पसंतीचा कौल देत या उच्चशिक्षित अपक्ष उमेदवाराच्या पारड्यात विजयाचं दान टाकलं. लोणारमधून बाळासाहेब भरघोस मतांनी निवडून आले आहेत. अलका टेकाम आणि बाळासाहेब दाभाडे..जाती पाती आणि घराणेशाहीचा कलंक लागलेल्या महाराष्ट्राच्या जि.प.मधली ही प्रातिनिधिक उदाहरणं. ग्रामीण महाराष्ट्राचा कल आता कुठं आहे, आणि ग्लोबल बनू पाहत असलेल्या या जगात आपणही मागं नाही, हे दाखवून देणाराच हा आशेचा किरण आहे.

close