पालिकेत काँग्रेसच्या पराभवावर हायकमांड नाराज

February 18, 2012 9:06 AM0 commentsViews:

18 फेब्रुवारी

मुंबईसह इतर महापालिकांमध्ये काँग्रेसच्या कामगिरीवर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. या पराभवासंदर्भात काँग्रेस हायकमांडनी अहवालही मागितला आहे. अशीही माहिती मिळाली आहे. दहा महापालिका मिळून काँग्रेसला अवघ्या – 263 जागा मिळाल्या आहेत, तर 27 जि. परिषदांमध्ये काँग्रेसला 459 जागा मिळाल्या आहेत. पण अनेक ठिकाणी मारही खावा लागला आहे. राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रसह अनेक जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. त्यामुळेच हायकमांड जास्त नाराज असल्याचं समजत आहे.

close