नाशिकमध्ये मनसेचाच महापौर – राज

February 19, 2012 2:11 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी

नाशिकमध्ये मनसेन 40 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता आपलाच नगरसेवक महापौरपदी विराजमान होईल असं मनसे अध्यक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांनी विजयी उमेदवारांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केलं.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत मनसेनं जोरदार मुंसडी मारली आहे. सर्वाधिक 40 जागा जिंकत मनसे मोठा पक्ष ठरला आहे. आज नाशिकमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयी उमेदवारांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केलं. यावेळी नाशिककरांना जो विश्वास दाखवला आहे त्यांच्या विश्वासला मनसे नगरसेवक पाच वर्ष कधीच तडा जाऊ देणार असा विश्वास व्यक्त केला. मतदारांचे आभारही राज यांनी मानले. तसेच मतदारांच्या मतांचा आदर राखत मनसेचा नगरसेवक महापौरपदी विराजमान होईल असे घोषित केले. वेळे अभावी प्रचार करायला जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पोहचता आले नाही अशी खंत ही राज यांनी केली. त्याचबरोबर कोणत्या पक्षासोबत आघाडी करणार यांचे उत्तर ठाळले. मात्र मनसेला सत्तेवर येण्यासाठी भाजप,किंवा राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागणार आहे. पण मनसे राष्ट्रवादी,काँग्रेससोबत जाणार याची शक्यता नाही. जर अपक्षासोबत जाण्यासाठीही त्यांच्या 14 च जागा आहे. त्यामुळे बहुमत सिध्द करण्यासाठी 62 जागा लागणार आहे. त्यासाठी कोणत्या तरी एक पक्षाशी हातमिळवणी करावी लागणार आहे. पण हा कोणता पक्ष असणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. आता कोणत समीकरण घडतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close