मुंबईत रिपाइंला युतीमुळे कमी जागा मिळाल्या – आठवले

February 20, 2012 10:04 AM0 commentsViews: 2

20 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीत रिपाइंने युतीसोबत हातमिळवणी करुन महायुती स्थापन केली पण रिपाइंला हवं तेवढं यश मिळालं नाही. यावर रिपाइं नेते रामदास आठवले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुंबईत रिपाइंच्या पराभवाला युती जबाबदार आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाची मतं आमच्याकडे येणं आवश्यक आहे. त्यांची मतं आम्हाला न मिळता त्यांच्याच बंडखोरांना मिळाली, त्यामुळे येणार्‍या पुढच्या निवडणुकीत महायुती मजबूत करायची असेल तर भाजप-सेनेची मतं आम्हाला मिळणं गरजेचं आहे असं रामदास आठवले म्हणाले आहे. तसेच आपण महायुतीत कायम राहणार आहोत असंही स्पष्ट केलं. मुंबई पालिकेच्या निकालात रिपाइंला एकच जागा मिळाली आहे. तर ठाण्यात 1 आणि उल्हासनगरमध्ये 4 जागा मिळाल्या आहेत.

close