लोकलच्या धडकेनं सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

February 20, 2012 3:25 PM0 commentsViews: 2

20 फेब्रुवारी

ठाण्याजवळ मुंब्रा कळवा दरम्यान एका सहा वर्षांच्या मुलीचा लोकलच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यूची बातमी रहिवाश्यांना कळताच संतप्त झालेल्या रहिवाशांनी रेल रोको आंदोलनाचे हत्यार उपसले. जवळपास एक तास लोकल अडवून धरली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 1 तासासाठी विस्कळीत झाली. या दरम्यान ठाणे ते दिवा दरम्यान स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. सहा वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे.

close