पुन्हा एकदा ‘ऑल द बेस्ट’ रंगभूमीवर

February 20, 2012 5:50 PM0 commentsViews: 57

20 फेब्रुवारी

मराठी रंगभूमी गाजलेलं नाटक ऑल द बेस्ट आता पुन्हा एकदा नव्या संचामध्ये आलं आहे. या नव्या नाटकात नवे चेहरे आहेत. आणि हे नाटक म्युझिकलही आहे. देवेंद्र पेम दिग्दर्शित ऑल द बेस्ट या एकांकिकेने एके काळी आयएनटी स्पर्धा गाजवली होती त्यातून भरत जाधव, संजय नार्वेकर आणि अंकुश चौधरी असे तीन नवे चेहरे इंडस्ट्रीला मिळाले. आता हेच नाटक पुन्हा एकदा नव्या टीमसह रंगमंचावर येतंय. पण या टीमच्या दिग्दर्शनाची धुराही जुन्याच शिलेदाराकडं म्हणजे देवेंद्र पेमकडे आहे.

आधी बर्‍याच कलाकारांनी साकारलेल्या या नाटाकतल्या भूमिका लोकांच्या मनात कायमच आहेत. 20 वर्षापूर्वीची ही कहाणी तशी जूनी असली तरी पुन्हा ती मांडताना त्यातले विनोद आणि सादरीकरण जूनं वाटणार नाही याचा विचार संपुर्ण टीमच्या डोक्यात आहे. ऑल द बेस्टच्या पहिल्या प्रयोगापासून ते आत्ता नव्या नाटकापर्यंत त्याचा प्रवास जवळून पहाणारे महेश मांजरेकर पात्रांच्या निवडीबद्दल कौतुकाने सांगतात.

या नाटकाच्या जून्या आणि नव्या फॅन्ससाठी भरपूर मनोरंजनाची हमी ऑल द बेस्ट टीम देतेय तेव्हा ही फ्रेश स्टारकास्ट लोकांना फ्रेश ठेवण्यात यशस्वी होईल असं म्हणायला हरकत नाही.

close