राहुल गांधींकडून आचारसंहिता भंग

February 20, 2012 6:10 PM0 commentsViews: 3

20 फेब्रुवारी

उत्तरप्रदेशच्या या मैदानात सर्व राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांचे नेते उतरले. निवडणुकीच्या प्रचारात निवडणूक आयोगाच्या आचारसंहीतेचं वारंवार उल्लंघन होण्याच्या घटना घडत आहेत. काँग्रेसने तर जणू यात आघाडीच घेतली आहे. आज तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडूनच आचारसंहितेचा भंग झाली. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. मुस्लिमांना ओबीसींच्या कोट्यात जागा देण्याच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्री बेनीप्रसाद वर्मा यांना नोटीस बजावली गेली होती. तर कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांची तक्रार तर थेट राष्ट्रपतींकडे केली होती.

close