पवार-दालमिया वाद चिघळला.

November 21, 2008 8:39 PM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबरबीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि जगमोहन दालमिया यांच्यातला वाद आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.बीसीसीआयच्या सहा जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोलकाता हाय कोर्टाने दिला होता. या आदेशाविरोधात बीसीसीआयनेही आज सुप्रीम कोर्टातअपील केलं. कोलकाता हाय कोर्टाने बीसीसीआयचं म्हणणं ऐकून घेण्यास नकार दिल्याने बीसीसीआयच्या वकिलांनी आज सुप्रीम कोर्टात या आदेशाविरोधात याचिका दाखल केली. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर , माजी अध्यक्ष शरद पवार, सचिव एन. श्रीनिवासन, रत्नाकर शेट्टी, निरंजन शहा आणि चिरायू अमीन या बीसीसीआयच्या अधिका-यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला होता. दालमिया यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार केल्याप्रकरणी खोटे कागदपत्र दाखल केल्याचा ठपका कोर्टाने त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

close