‘किंगफिशर’ला ताकीद ; कर्मचार्‍यांचे पगार ताबडतोब द्या !

February 21, 2012 9:59 AM0 commentsViews: 5

21 फेब्रुवारी

किंगफिशर एअरलाईन्सचे समोरच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कंपनीचे सीईओ संजय अगरवाल यांची आज डीजीसीए (DGCA) कडून चौकशी झाली. कंपनीची 28 विमानं सध्या वापरण्याच्या स्थितीत आहेत. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि विमान रद्द होत असेल तर त्याची पूर्वसूचना प्रवाशांना देण्यात यावी असं डीजीसीएने म्हटलं आहे. शिवाय कर्मचार्‍यांच्या थकलेले पगारही ताबडतोब देण्याच्या सुचना किंगफिशरला देण्यात आल्या आहेत. कंपनीकडे पुरेसे पायलट्स असून येत्या 7 दिवसांमध्ये सगळ्या फ्लाईट्स नेहमीच्या वेळापत्रकानुसार जातील असं संजय अगरवाल यांनी डीजीसीएला सांगितले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये रद्द झालेल्या किंगफिशरच्या फ्लाईट्सविषयी डीजीसीएने माहिती मागवली आहे आणि यासाठी किंगफिशरला 24 तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

close