निवडणुकीच्या निकालावर समाधानी – शरद पवार

February 20, 2012 1:24 PM0 commentsViews: 1

20 फेब्रुवारी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर राहिली ही समाधानाची बाब असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. ज्या पालिका आणि जि.प.मध्ये काँग्रेस क्रमांक एकवर असेल तीथं राष्ट्रवादी त्यांना पाठिंबा देईल तर जिथे राष्ट्रवादी क्र.1 वर असेल तिथं काँग्रेसने पाठिंबा द्यावा असं निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सापत्न वागणूक मिळाली. तिथं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. तिथं सर्वांनी एकत्र चर्चा करून निर्णय घ्यावा असंही पवारांनी म्हटलं आहे. महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीच्या निकालांबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत बोलावली होती. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, आर आऱ पाटील, छगन भुजबळ, मधूकर पिचड आणि जयंत पाटील हजर होते. या बैठकीत महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर चर्चा केली.

close