जे.डे हत्येप्रकरणी जिग्ना वोराविरोधात आरोपपत्र दाखल

February 21, 2012 10:29 AM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी

मिड डे चे पत्रकार जे.डे.यांच्या हत्येप्रकरणात पत्रकार जिग्ना वोरा हिच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. जे डे यांच्या हत्येमध्येजिग्ना वोराचा हात असल्याचा संशय आहे. याप्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. यात जिग्ना ही अकरावी आरोपी आहे. तर 2 जण फरार आहेत. फरार आरोपीत गँगस्टर छोटा राजन याचा देखील समावेश आहे.सर्व आरोपींच्या कोठडीत 12 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

close