फटाका कारखान्यात लागलेल्या आगीत 4 महिलांचा मृत्यू

February 21, 2012 10:37 AM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी

मंगळवेढा तालुक्यातल्या भाळवणी इथं काल फटाका कारखान्यात आग लागून काल चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. त्या महिला कामगारांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, या घटनेनंतर आता इतर गोदामातील फटाके सुरक्षीतस्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र फटाका कारखान्याचा मालक आझाद पटेल दारूवाले हा अजूनही फरार आहे. त्याला ताबडतोब अटक करण्याची मागणी मृतकांच्या नातेवाईकांनी केली आहे.

close