गणेशच्या जिद्दीची कहाणी

November 21, 2008 9:03 PM0 commentsViews: 8

21 नोव्हेंबर बीडगणेश नवलेएखाद्याच्या विजयी कर्तृत्वाचा गौरव करताना आपण एक हाती यश मिळवलं असं सहज म्हणून जातो, पण नियतीनं ज्याचा एक हातच हिरावून घेतला त्या गणेश आवंतकरच्या यशाचं वर्णन करताना खरच शब्दही कमी पडतात. बीडमधल्या गणेशच्या जिद्दीची ही कहाणी.स्विमिंगमध्ये डॉल्फिन प्रमाणे सुर मारणारा गणेश आवंतकर हा एका हातानं अपंग आहे. पण आपल्या या अपंगत्वावर त्यानं जिद्दीच्या जोरावर मात केलीयं. जिद्दीलाच जणू त्यांन आपला हात बनवला आहे. गणेशचा उजवा हात उसाच्या चरख्यात गेला. पण तरीही स्विमिंगची आवड असल्यामुळे गणेश जिद्दीनं स्विमिंग करू लागला.राज्य स्विमिंग स्पर्धेत गणेशनं दोन मेडल जिंकली आहेत. आणि आता त्याला वेध लागले आहेत ते राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेचे. गणेश सांगतो माझं गोल्ड मेडल काही सेकंदानी हुकलं पण आता मी राष्ट्रीय स्पर्धेची तयारी करतो आहे. पण राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळायचं असेल तर मेहनतीबरोबर आर्थिक मदत पाहिजे. आपल्या अपंगत्वावर मात करून गणेशनं स्पर्धातर जिंकल्या पण आता गणेशला हवाय आर्थिक मदतीचा हात. स्विमिंगसोबतच गणेशनं अभ्यासावरही लक्ष केंदि्रत करीत पदवीही मिळवली आहे. सद्या गणेशची ही झुंज एकाकी ठरत आहे. गणेशला आता खरी गरज आहे ती मदतीच्या असंख्य हाताची.

close