ग्रामीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अण्णांचा गौरव

February 20, 2012 2:56 PM0 commentsViews: 7

20 फेब्रुवारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ग्रामीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गौरव करण्यात येणार आहे. अण्णांना दिल्लीमध्ये येत्या 23 फेब्रुवारीला होणार्‍या पुरस्कार वाटपाच्या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. अण्णांना पंचवीस लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 22 तारखेला अण्णांची आंदोलनासाठी दिल्लीत कोअर कमिटीची बैठक आहे. तर 23 तारखेला अण्णा या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या पुरस्कारनंतर अण्णा विश्रांतीसाठी शनिवारी राळेगणसिद्धीला परतणार आहेत. अण्णांना औषधाचा साईड इफेक्ट झाल्यामुळे अण्णा सध्या बंगळुरुमध्ये उपचार घेत आहेत.

close