गडचिरोलीत दोन नक्षलवाद्यांना अटक

February 21, 2012 10:40 AM0 commentsViews: 4

21 फेब्रुवारी

गडचिरोली जिल्हात एटापल्ली जंगलातून दोन नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सीआरपीएफ आणि जिल्हा पोलिसांच्या संयुक्त नक्षलविरोधी अभियानादरम्यान अटक झाली आहे. ही अटक नक्षलवाद्यांना मोठा हादरा समजला जातो. एटापल्ली जंगलात नक्षलवाद्यांची गुप्त बैठक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. अटक करण्यात आलेला नक्षलवादी प्रकाश उर्फ देविदास गावडे हा उत्तर गडचिरोली-गोंदिया या विभागाचा कमांडर होता, नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या विविध 15 हिसांचाराच्या घटनेत त्याचा सहभाग होता. तर अटक करण्यात आलेली दुसरी महिला नक्षलवादीचं नाव रम्मी उर्फ जुम्मी कोवासे असून ती उत्तर गडचिरोली-गोंदिया या विभागाची सदस्य आहे.

close