बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता

February 21, 2012 11:58 AM0 commentsViews: 11

21 फेब्रुवारी

दक्षिण मुंबईत मनसेच्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गटनेते बाळा नांदगावकर राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत लालबाग, परळ, शिवडी या विभागात मनसेला चांगला फटका बसला आहे. यासंदर्भात आमदार बाळा नांदगावकर यांनी सर्व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत पराभवाची कारणमिमांसा करण्यात आली. त्यांनी सर्वांकडून अहवालही मागवला आहे. यानंतर ते गटनेते पदाचा राजीमाना देतील, अशी शक्यता आहे.

close