राज ठाकरेंविरोधातील गुन्हा रद्द

February 21, 2012 12:50 PM0 commentsViews: 12

21 फेब्रुवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने एक दिलासा दिला आहे. राज यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी 2008 सालात विक्रोळी इथल्या सभेत अबू आझमी हे उत्तर भारतीयांना काट्या वाटणार असतील तर मी मराठी तरुणांना तलवारी वाटेन असं वक्तव्य केलं होतं. या बाबत राज ठाकरे यांच्या विरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. कलम 153 (ए) आणि 153 (बी) या नुसार हा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात राज यांना अटक ही झाली होती. मात्र, हा गुन्हाच आज मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. राज्य सरकारने हा खटला चालवण्यासाठी आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी दिली नाही, या कारणास्तव हा गुन्हा रद्द कऱण्यात आला आहे.

close