महाराष्ट्रसुद्धा आमचाच आहे – लालूप्रसाद यादव

November 21, 2008 6:09 PM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबर महाराष्ट्र हे आमचेच राज्य आहे. राज ठाकरे सारख्या नेत्यांना भविष्य नाही असं रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव म्हणाले .ते हिदुस्थान टाईम्सच्या लीडर समिटमध्ये बोलत होते.या देशातील सर्व राज्ये एकसंघ भारत देशातंर्गत येतात त्यामुळे आपण सर्वजण एकच आहोत. याअर्थाने महाराष्ट्रसुद्धा आमचाच आहे अशी पुष्ठी त्यांनी पुढे जोडली. लालूच्या याविधानावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, लालू देशाचे मंत्री असलेतरी त्यांच्या विधानाला कोणी सीरियस घेत नाही. आणि एकसंघ भारताविषयी त्यांचं विधान बरोबर असलं तरी महाराष्ट्राविषयी किंवा इथल्या नेत्यांना त्यांनी शिकवण्याच्या गोष्टी करू नये.बिहारी माणसांबद्दल लालू प्रसाद यादव म्हणाले, बिहारमधून सर्वात जास्त लोक बाहेर जातात हे खरं असलं तरी बिहारमधलेअनेक हुशार लोक परदेशात चांगल्या पदावर आहेत. राज ठाकरे यांना माध्यमांनी मोठं केलं आहे. एकदा का प्रसिद्धी कमी झाली की राज ठाकरे यांचं राजकीय करिअर संपुष्टात येईल.

close