आशा शिंदे हत्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

February 21, 2012 1:48 PM0 commentsViews: 2

21 फेब्रुवारी

सातार्‍यात काल खोट्या प्रतिष्ठेपायी एका बापाने आपल्याच मुलीचा जीव घेतल्याची धक्कदायक घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज सातार्‍यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक संघटनांनी मूक मोर्चा काढला.

दुस-या जातीततल्या मुलाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणून औंधमधल्या आशाला आपला जीव गमवावा लागला. बदनामी होईल, या निरर्थक भीतीपोटी शंकर शिंदेनं पोटच्या पोरीवर लोखंडाच्या सळईचा हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ सातार्‍यातल्या सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी ऑफिसवर मूक मोर्चा काढला. आणि आपला राग व्यक्त केला. या निषेध मोर्चात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. औंधमधल्या ऑनर किलींगच्या घटनेचा सर्वच थरातून निषेध व्यक्त केला जात आहे. माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य करणार्‍या शंकर शिंदे या आशाच्या वडिलांना 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close