भरत पवार यांचं सेलिब्रिटी कॅलेंडर लाँच

February 21, 2012 4:31 PM0 commentsViews: 3

21 फेब्रुवारी

फोटोग्राफर भरत पवार यांचं सेलिब्रिटी कॅलेंडर सोमवारी हॉटेल हॉलिडे इन इथे संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं आहे. या वेळेस मराठी इंडस्ट्रीमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कॅलेंडरमधून मराठी कलाकारांचे चेहरे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांच्या इमेजला छेद देण्याचा भरत पवारचा प्रयत्न त्याच्या प्रत्येक छायाचित्रातून दिसतोय. या कॅलेंडरमध्ये मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे, अमृता खानविलकर, भरत जाधव, उपेंद्र लिमये अशा बर्‍याच सेलिब्रिटींची पूर्णपणे निराळी छटा बघायला मिळत आहे.

close