पवईत हिरानंदानींना बांधकाम करण्यास कोर्टाची मनाई

February 22, 2012 1:26 PM0 commentsViews: 2

22 फेब्रुवारी

मुंबई येथील हिरानंदानी बिल्डर्स यांना पवईमध्ये बांधकाम करायला हायकोर्टाने मनाई केली आहेत. हिरानंदानी यांनी तिथं सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने ठेवला आहे. 400 आणि 800 स्क्वेअर फुटाचे प्रत्येकी पंधराशे घरं बांधून ते मध्यमवर्गीयांना देण्याचे आदेश हायकोर्टाने हिरानंदानी यांनी दिले आहेत. राज्य सरकार आणि बीएमसी आणि एमएमआरडीए आणि डेव्हलपर विरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई करु शकते, असं मतही कोर्टाने व्यक्त केली आहे. पवईत किती एफएसआय वापरला गेला आणि किती शिल्लक आहे, याची माहिती कोर्टाला द्यावी असा आदेशही कोर्टाने दिला आहे.

close