सचिन-वीरु खूप खेळले आता…बस्स झालं !

February 22, 2012 3:22 PM0 commentsViews: 1

22 फेब्रुवारी

भारतीय टीममधल्या शाब्दिक चकमकी बाहेर येत आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या फॉर्मवरुनही खडाजंगी चर्चा होत आहे. खासकरुन वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या दोघांनीही वन डेतून आता निवृत्त व्हावे का असाही सवाल उठत आहे. खरंतर सचिन – सेहवागची जोडी वन डे क्रिकेटमधली एक यशस्वी आक्रमक ओपनिंग जोडी आहे. पण गेल्या काही महिन्यात दोघांनाही फॉर्मने सतावलं आहे.

दोघांचाही वन डे रेकॉर्ड थक्क करणारा आहे. पण सध्या दोघंही खराब फॉर्मनी गांजले आहे. ब्रिस्बेन वन डेत तर सेहवागने या खराब शॉटमुळे स्वत:चा घातच केला. तर सचिनही सुरेख सुरुवातीनंतर असा आऊट झाला. पण दोघांच्या अशा फॉर्ममुळे भारतीय क्रिकेटमध्ये आता वेगळी चर्चा सुरु झालीय. क्रिकेटमधली ही दोन मोठी नावं…पण त्यांना टीममध्ये जागा मिळू नये अशी खुली चर्चा सुरु झाली आहे. अर्थात काही प्रतिक्रिया सावधही आहेत.

तेंडुलकर खरंतर वर्ल्ड कप विजयानंतर पहिल्यांदाच वन डे क्रिकेट खेळतोय. पण सगळ्यांना हेच म्हणायचंय की, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लगेच त्याने वन डे क्रिकेट खेळणं थांबवायला हवं होतं.

सेहवागच्या फॉर्मवर पहिल्यांदाच एवढी चर्चा होतेय. कारण जेव्हा त्याची बॅट चालते तेव्हा तो काय कमाल करतो हे त्याने अनेकदा दाखवून दिलं आहे. वन डे त 219 रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने मागच्याच वर्षी केला. पण त्याचबरोबर वन डेत त्याचं ऍव्हेरेज फक्त 35 रन्सच्या आसपास आहे हे विसरुन चालणार नाही. दोघांचे शॉट्स बघितले तर सेहवागला सचिनचीच प्रतिकृती का म्हणतात हे पटतं. पण आता वेळ अशी आलीय की, दोघांच्या कारकीर्दीवर एकाच वेळी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

close