माझ्यावर फोडलं जातंय पराभवाचं खापर- जोशी

February 22, 2012 9:44 AM0 commentsViews: 7

22 फेब्रुवारी

शिवसेनेचे दादरमधील पराभवाचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जात असल्याचं सांगत मनोहर जोशींनी दादरमधल्या पराभवातून हात झटकले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर भागात शिवसेनेला जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला. आता याचं पराभवाचं शिवसेनेत चिंतन सुरु झालंय.याबाबत आज मनोहर जोशींच्या ऑफिसमध्ये बैठकही पार पडली. यावेळी बोलताना, या पराभवासाठी आपण जबाबदार नसल्याचे मनोहर जोशींनी स्पष्ट केलं. तसेच बाळासाहेब कोणत्याच शिवसैनिकाबद्दल असा विचार कधीच करत नाही असंही जोशी यांनी स्पष्ट केलं.

close