ठाण्यात मनसेमध्ये फूट पडण्याची शक्यता

February 22, 2012 10:04 AM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

ठाणे मनपा निवडणुकीनंतर मनसेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसेच्या पक्ष संघटनेत गटबाजी उफाळुन आली आहे. पक्षातील काही लोकांच्या मनमानी कारभारामुळे पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याची टीका आता होऊ लागली आहे. पक्षासाठी झटणार्‍या आणि संघटना वाढवणार्‍यांना पक्षात स्थान राहिले नसल्याची टीका ठाणे मनसेचे शहराध्यक्ष हरी माळी यांनी केली. ठाणे महानगर पालिकांच्या निवडणुकीत पक्षाने निवडणुक प्रक्रियेत आपल्याला डावलल्याचा आरोपही त्यांनी केला. सुधाकर चव्हाणांच्या कारभारावरही त्यांनी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

close