रामदास आठवलेंनी घेतली छगन भुजबळांची भेट

February 22, 2012 5:12 PM0 commentsViews: 3

22 फेब्रुवारी

नाशिकमध्ये सत्तास्थापनेसाठी नवा पॅटर्न निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनसेला रोखण्यासाठी महायुतीला जवळ करण्याचे प्रयत्न सुरु केले. आज रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची त्यांनी भेट घेतली. नाशिकमध्ये महापौरपद रिपब्लिकन पार्टीला दिल्यास महायुतीचा पाठिंबा मिळेल का याची चाचपणी भुजबळांनी सुरु केली आहे. आता आठवले यांच्यावर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना या फॉर्मुल्याबाबत राजी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात ते यशस्वी होतात का हे लवकरच कळेल.

close