बाळा नांदगावकरांचा राजीनामा राज ठाकरेंकडे सुपूर्द

February 23, 2012 10:25 AM0 commentsViews: 12

23 फेब्रुवारी

महापालिका निवडणुकीत दक्षिण मुंबईत मनसेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊ असं आश्‍वासन राज ठाकरेंनी दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितलं.त्यामुळे लवकरचं मनसेच्या गटनेतेपदी नव्या चेहरा दिसण्याची शक्यता आहे.आमदार प्रविण दरेकर, शिशिर शिंदे आणि नितीन सरदेसाई यांची नावं चर्चेत आहे.

close