काश्मीरमध्ये हिमस्खलन 14 जवानांचा मृत्यू

February 23, 2012 10:42 AM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारी

जम्मू काश्मीरमध्ये उत्तरेकडे बांदीपोरा आणि गांडरबल जिल्ह्यात हिमस्खलन होऊन 12 जवानांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आठ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अजूनही चार जवानांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरु आहे. बांदीपोरा येथील दावारगांवात रात्री सेनेचं मुख्यालय हिमस्खलन च्या विळाख्यात आले. तर दुसरीरडे सोनमर्गमध्ये सेनेच्या शिबिर सुरु होते येथेही हिमलस्खलनात आणखी 3 जवानांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. तर तिसरे हिमस्खलन गांडरबल येथील रामवाडी भागात झाले आहे. यात सेनेचे शिबि उध्दवस्त झाली आहे. पण कोणत्याही जीवितहाणीची बातमी नाही.

close