कोकणात राणे – केसरकर यांच्यात कलगीतुरा

February 23, 2012 4:39 PM0 commentsViews: 4

23 फेब्रुवारी

जिल्हा परिषद निवडणुका झाल्या तरी सिंधुदुर्गात नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांचा वाद सुरूच आहे. राणेंनी कणकवलीत घेतलेल्या जिल्हा परिषद उमेदवार्‍यांच्या विजयी मेळाव्यात आमदार केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. काहीही झालं तरी केसरकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होऊ देणार नसल्याचीही प्रतिज्ञा राणेंनी केली. तर आमदार केसरकर यांनीही जिल्हा परिषद निवडणुकीतल्या मतांचा अभ्यास करून राणेंनी स्वत: आमदारकी लढ़ावावी की नाही हे ठरवावं असा सल्ला दिला.

नारायण राणे म्हणतात, हा माझ्यावर टीका करतो मला मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं म्हणतो. ह्याला विधानसभेत नीट बसता येत नाही .येत्या विधानसभेला ह्याला मी आमदारच होऊ देणार नाही. राणेंच्या टीकेला उत्तर देत दीपक केसरकर यांनी सल्ला दिला. निम्मी सत्ता आम्ही काबीज केली. राणे महाराष्ट्रासमोर पोकळ बढाई मारतात. तुमच्या स्वत:च्या मतदारसंघातली पंचायत समिती पडते आणि त्याचा उल्लेख सुधा तुम्ही करत नाही उद्या ते आमदार म्हणून कितपत निवडून येऊ शकतील हे या रिझल्टवरून त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. की आपण आमदार म्हणून निवडून येऊ शकतो की नाही असा सल्ला केसकरांनी दिला.

close