वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या सत्तेला सुरुंग

February 23, 2012 4:46 PM0 commentsViews: 14

23 फेब्रुवारी

वसई तालुक्यात माजी आमदार हितेंद्र ठाकूरांची गेल्या 20 वर्षापासून एकहाती सत्ता होती. त्याला जिल्हापरिषदेत आमदार विवेक पंडित यांनी जनआंदोलन समिती व शिवसेना युतीच्या माध्यमातून सुरुंग लावला. एवढचं नाही तर राष्ट्रीय पक्ष असणार्‍या काँगे्रस, राष्ट्रवादी पक्षांच्या 10 उमेदवारांची अनामत रक्कम जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे जप्त झाली आहे. वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 3 जागी जनआंदोलन समितीने बाजी मारली. चंद्रपाडा जिल्हा परिषदेमध्ये जनआंदोलनाच्या संगिता भोमटे 7,241 यांनी बहुजन विकास आघाडीच्या मिनाक्षी घायाळ यांना 7,065 यांचा पराभव केला. तर काँग्रेसच्या कुसुम वंजारी 525 यांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यांनी चंद्रपाडा जिल्हा परिषद, अर्नाळा जिल्हा परिषद व खोचिवडे पंचायत समितीसाटी एकाच वेळी अर्ज भरला होता मात्र एकाही ठिकाणची अनामत रक्कम वाचवू शकल्या नाहीत. वसई तालुक्यात जनआंदोलन समितीने 20वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे.

close